लंडन : ब्रिटनच्या सर्वात वयोवृद्ध वैमानिकाचे निधन झाले आहे. जॉन पँडी हॅमिंगवे, असे त्यांचे नाव आहे. डब्लिन येथे त्यांचे सोमवारी निधन झाले. ते १०५ वर्षांचे होते. ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्समध्ये ते कार्यरत होते. २० व्या वर्षी ते हवाई दलात रुजू झाले होते. जागतिक महायुद्धावेळी जर्मनीच्या नाझी हवाई दलाने ब्रिटनवर १९४० मध्ये हवाई हल्ला केला होता. त्या विमानांना रोखण्यात आणि पळवून लावण्यात जॉन यांनी मोलाचे कार्य केले. ऑगस्ट १९४० मध्ये जर्मनीच्या विमानाचा पाठलाग करतान त्यांना त्यांचे विमान उतरावावे लागले होते. नंतर पुन्हा आक्रमक कारवाईत त्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या कौशल्याची दखल घेऊन त्यांना १९४१ मध्ये शौर्यपदकाने गौरविले होते.
Fans
Followers